पीयूष नाशिककर
नाट्य परिषदेची निवडणूक जाहीर झाली आणि हळूहळू त्यामागील राजकारणाने तोंड वर काढले. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नाशिकच्या विश्वास ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली. तसे पाहिले तर ठाकूर यांचा नाटकाशी काय संबंध? हा जरा संशोधनाचा भाग ठरेल. पण ठाकूर हे राष्टÑवादीच्या सहकार विभागाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांची राष्टÑवादीतील मंडळींशी असलेली जवळीक सर्वश्रुत आहेच. तसेच नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे मावळते अध्यक्ष आमदार हेमंत टकले हे नाशिकचेच. ते तर खासदार सुप्रिया सुळे यांचे ‘थिंक टॅँक’ समजले जातात. तर नावाप्रमाणेच ठाकूर हेदेखील त्यांच्या विश्वासातील आहेत. दुसरीकडे टकले यांचा पाठिंबा विनय आपटेंच्या नटराज
पॅनलला आहे. नुकतेच झालेले नाट्यसंमेलन हे ‘साहेबांच्या’ बारामतीत झाले. या सर्व बाबींचा बारकाईने विचार केला तर कुठेतरी नाट्य परिषद निवडणुकीच्या या राजकीय प्रयोगाची तालीम यापूर्वीच झाल्याचे स्पष्ट होते आहे. मुख्य निवडणूक अधिकारी विश्वास ठाकूर हे नाशिक येथील विश्वास बॅँकेचे संस्थापक, अध्यक्ष, ‘अर्थ’ क्षेत्रातील विविध पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. असे असताना सहकार क्षेत्रात ‘ठाकूर’ची भूमिका वठवणाºया या पात्राला नाट्य क्षेत्रात ही भूमिका कशी मिळाली हा प्रश्नच आहे. त्यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक कोणत्या निकषांवर केली हे आजपर्यंत गुलदस्त्यातच आहे.
मोहन जोशी यांनी मुख्य निवडणूक अधिकारी नाशिकचा असण्यावर आक्षेपही घेतला होता. यावर ठाकूर यांनी आपल्याला या कामाबद्दल विचारण्यात आले आणि मी होकार दिला. जोशींना आक्षेप घ्यायचा होता तर नियामक मंडळाच्या बैठकीत उपस्थित राहून त्यांनी आक्षेप का घेतला नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. पण पुन्हा मुद्दा तोच राहतो की, ठाकूरच का? त्यातही मतपत्रिका नाशिकला छापल्या गेल्या आणि मुंबईत तब्बल 1999 बोगस मतदान आढळल्याने ठाकूर यांच्याकडे अनेकांनी बोट दाखवले. अशा अनक मुद्द्यांमध्येच जोशी आणि आपटेंची पूर्वीची जखम ताजी होत होती. याची तयारी अगदी निवडणुकीच्या आधीपासूनच करण्यात येत होती. जरा मागे वळून पाहिले तर नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे आई रेणुका मातेच्या पवित्र ठिकाणीच रंगदेवतेची पूजा करणाºया मोहन जोशींनी घातलेल्या गोंधळामुळे त्यांना नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर उपाध्यक्ष हेमंत टकलेंनी अध्यक्षपदाची स्वीकारलेली सूत्रे आणि जोशींकडे मागितलेला हिशेब यामुळे जोशी दुखावले गेले होतेच. दुसरीकडे जोशी अध्यक्ष असताना त्यांनी 2009 च्या बैठकांना आपटे आणि प्रशांत दामले सलग तीन वेळा गैरहजर असल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करत असल्याची नोटीस बजावली होती. त्यामुळेही आपटे दुखावले गेले होते. दोघांच्याही या जखमांवरची खपली कुठेतरी या निवडणुकीच्या निमित्ताने निघू पाहते आहे. त्यामुळेच हा कलगीतुरा रंगतो आहे. कदाचित याची कुणकुण ‘उत्स्फूर्त’ पॅनलच्या मोहन जोशी यांना यापूर्वीच लागली असेल. म्हणूनच त्यांनी विनय आपटेंनी बोगस मतपत्रिका छापल्याचे आरोपही केले होते.
नाट्य परिषदेचे हे राजकारण केवळ मुंबईतच रंगले असे नाही तर रत्नागिरी, नाशिकमध्येही सत्तेसाठी चढाओढ झाली. रत्नागिरीत आमदार उदय सामंत हे नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या विरोधात लेखक प्र. ल. मयेकर यांनी अर्ज दाखल केला होता. सामंतांनी मयेकरांना सरळ माघार घ्यायला सांगितली. मयेकरांनीही दोन खडे बोल सुनावले. तिकडे असा फड रंगत असताना नाशिकमध्ये तर सुरुवातीला प्रत्यक्ष राजकारणच निवडणुकीत येत होते. जुने रंगकर्मी आणि चित्रपट अभिनेते आमदार बबनराव घोलप यांनीही अर्ज दाखल केला होता. निवडणुका झाल्यावर नाशिकच्याच एका ज्येष्ठ कलाकाराने येथेही बोगस मतदान झाल्याची तक्रार केल्याने हे राजकारण अधिकच तापले. कलाकारांकडे आज तरी रसिक मायबाप आदराने पाहतात. पण त्यांच्यातील राजकारण निवडणुकीच्या निमित्ताने असे चव्हाट्यावर आल्यावर यांना रसिकाश्रय मिळेल का, याचा त्यांनी विचार करण्याची गरज आहे. त्यांच्या मुखवट्यावरील रंग उतरायला वेळ लागणार नाही.

No comments:
Post a Comment