Tuesday, 12 February 2013

'घाशीराम'ची चाळिशी

लोकसत्तातून साभार
पुण्याच्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन या संस्थेने १६ डिसेंबर १९७२ रोजी 'घाशीराम कोतवाल'चा पहिला प्रयोग सादर केला. विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले हे नाटक वादविवादांनी आणि अनेक अर्थानी गाजले. तथापि भारतीय रंगभूमीवर ते आज एक मैलाचा दगड ठरले आहे. १६ डिसेंबर २०११ रोजी 'घाशीराम'ने ४० व्या वर्षांत पदार्पण केले. त्यानिमित्ताने 'घाशीराम'च्या पहिल्या प्रयोगापासून ते 'थिएटर अ‍ॅकॅडमी, पुणे' या संस्थेने १९९२ पर्यंत देश-परदेशात केलेल्या प्रत्येक प्रयोगात सूत्रधाराची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या श्रीराम रानडे यांनी सांगितलेला 'घाशीराम'च्या तालमीपासून ते पहिल्या प्रयोगापर्यंतचा जिवंत इतिहास..

पुण्यनगरीत जायचं, राष्ट्र सेवादल कलापथकात आणि पी. डी. ए.मध्ये शिरायचं, पडेल ते काम करायचं आणि जमेल तसं शिकायचं; पण सांगली-मिरज सोडायचंच, असा निर्धार करून मी १९५९ मध्ये पुण्यात आलो. कलापथकाची दारं श्याम पटवर्धन, शाहीर लीलाधर हेगडे आणि निळू फुले यांच्यामुळे पटकन् उघडली. मात्र, पी. डी. ए.चं दार उघडायला तब्बल १२ वर्षांची तपश्चर्या करावी लागली. पुण्यात पी. डी. ए.चा प्रत्येक नाटय़प्रयोग, 'पुरुषोत्तम'च्या एकांकिका, राज्य नाटय़स्पर्धा या साऱ्या गोष्टींनी मी झपाटून गेलो होतो.
मी बी. एड्. करत असताना पी. डी. ए.चे श्रीधर राजगुरू यांचा माझा परिचय झाला आणि त्यांचं बोट धरून मी पी. डी. ए.मध्ये शिरलो. 'जब्बार पटेल एक नवीन नाटक करताहेत; तू संध्याकाळी ७- ७.३० च्या सुमारास गरवारे प्रशालेत ये,' असा त्यांनी मला निरोप दिला. तोवर जब्बार काय ताकदीचा कलावंत आहे, हे मी त्यांच्या ह्यजनावरह्ण, ह्यलोभ असावाह्ण, ह्यतू वेडा कुंभारह्ण, ह्यजादूगारह्ण, ह्यखून पाहावा करूनह्ण, ह्यअशी पाखरे येतीह्ण इत्यादी एकांकिका व नाटकांमधून जोखून घेतो. त्यांच्या एकतर्फी प्रेमातच पडलो होतो म्हणा ना! संध्याकाळी गरवारे शाळेच्या हॉलमध्ये गेलो तर माझ्याआधीच तिथं विशी-बाविशीची, गोरी-घारी २०-२५ पोरं जमली होती. कुणी काय, कुणी काय गाऊन दाखवलं. कुणी उतारा म्हणून दाखवला. मलाही काहीतरी म्हणून, करून दाखवायला सांगितलं गेलं. मी डाव्या कानावर हात ठेवून वसंत बापटांच्या महाराष्ट्राच्या पोवाडय़ातला काही भाग म्हणून दाखवला. आणि घरी परत आलो!
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या निमित्ताने फर्गसनमध्ये सतीश आळेकर आणि सुरेश बसाळे भेटले. त्यांनी सांगितलं- 'आपण ह्यघाशीराम कोतवाल' हे विजय तेंडुलकरांचं नाटक यावर्षीच्या राज्य नाटय़स्पर्धेसाठी पी. डी. ए.तर्फे करतो आहोत. तुझी निवड केली आहे. लवकरच तालमी सुरू होतील.'
तालमीचा पहिला दिवस आठवला की आजही माझ्या अंगावर काटा येतो.. दरदरून घाम फुटतो. सूत्रधाराची 'चुकलो बामणोजी, पाया पडतो बामणोजी, माफी असावी बामणोजी..' अशी छोटी छोटी संवादवजा वाक्यं म्हणताना तोंडाला फेस आला. आठ-दहा दिवस असा सिलसिला सुरू होता. सहकाऱ्यांची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवू लागली. आज अखेरचा दिवस. 'जमलं तर ठीक, नाहीतर 'घाशीराम'ला अखेरचा रामराम!' अशी खूणगाठ मनाशी बांधूनच तालमीला गेलो. त्या दिवशी जब्बारला काय वाटलं कुणास ठाऊक; त्यानं आज आपण स्टँडिंग रिहर्सल घेऊ असं ठरवलं. चंद्रकांत काळे आणि मी असा भटजी-सूत्रधाराचा प्रवेश सुरू झाला आणि काय कळ फिरली देव जाणे- आम्ही दोघे मुक्तपणे वावरू लागलो. 'तिसरा तुझा बाप, चावला तुला साप' असे म्हणून चंद्रकांत निघाला आणि मी 'अगंगंगं! विंचू चावला' असं म्हणत एक पाय हाताने धरून नाचू लागलो. चंदूही माझ्याभोवती गरागरा फिरू लागला. 'अहो, तुम्ही सरदार, माडीवाले, गाडीवाले, घोडीवाले, कुठेजी चालले?' असे संवाद म्हणताना एका पायाची मांडी घालत जमिनीवर बसकन् मारली. 'गाढवाच्या लग्ना'तील दिवाणजीच्या भूमिकेतील जातिवंत सोंगाडय़ा वसंत अवसरीकरची ही सही सही नक्कल होती. त्या दिवशीच्या तालमीत अंगात काहीतरी संचारल्याचा भास होत होता.
दुसऱ्या दिवसापासून कृष्णदेव मुळगुंद घामटं निघेपर्यंत आम्हाला नाचवायचे. स्वत:ही नाचायचे. मग यायचे संगीतकार भास्कर चंदावरकर. त्यांनी नवीन चाली बांधून आणलेल्या असायच्या. मला सर्व प्रकारच्या गाण्यांची आवड; पण सूर कशाशी खातात, याचा पत्ता नाही. आता आली का पंचाईत! सूत्रधाराच्या तोंडी शास्त्रीय ठुमरीपासून ते लावणी, कव्वाली, कीर्तनापर्यंत सर्व प्रकारची गाणी! पुन्हा 'आऊट' होण्याची पाळी! पण दिग्दर्शक जब्बार पटेलने हा नो बॉल डिक्लेअर केला. मी वाचलो. जब्बारने एका सूत्रधाराचे तीन भाग केले. रवींद्र साठे, चंद्रकांत काळे यांना शास्त्रीय संगीताची भक्कम बैठक. त्यांच्या तोंडी त्या चालींची गीते. ते निळ्या पगडीतले परिपाश्र्वक आणि लोकगीतं, पोवाडा अशी मी बेसूर-भेसूर झालो तरी मला सांभाळून घेणारी कोरस पद्धतीची गाणी सर्व ब्रह्मवृंदाकडे- अशी योजना झाली.
तालमी रंगू लागल्या. सुरुवातीला तालमीला जायला टाळाटाळ करणारा मी आता कधी एकदा संध्याकाळ होते आणि नाच-गाणे आणि नाटकाची तालीम सुरू होते याची ओढ लागू लागली. अस्सल दारूडय़ाचे हात सूर्य डुबला की थरथरू लागतात आणि पावलं आपोआप गुत्त्याकडे वळतात तशी आम्हा सर्वाची अवस्था झाली. संध्याकाळी साडेसहा ते रात्री दोन-अडीच अशी अखंड तालीम जवळजवळ तीन- साडेतीन महिने सुरू होती. या काळात मी फक्त एकच दिवस गैरहजर होतो. तेसुद्धा वासुदेव पाळंदे यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलो होतो म्हणून! जब्बार दौंडहून यायचा. रात्री तालीम संपवून आम्ही परतत होतो. संभाजी पुलाच्या चौकात जब्बार थांबला आणि 'गौरी गेली, नाना राहिले, घाशीराम कोतवालने गौरीवियोगाचे दु:ख काळजात ठासले।' या ओळी साभिनय म्हणून दाखविल्या. एकदा लकी रेस्टॉरंटपाशी, 'राम्या, आता तू योग्य ट्रॅकवर आहेस. चालू ठेव. नंतर मी तुला अधिक बारकावे सांगतो,' असं म्हणून जब्बारनेच दिलासा दिला. रोज नवनवीन काही सुरू होतं. पहिला अंक बसायलाच विलंब लागला. दुसरा अंक त्यामानानं लवकर बसला. डॉ. मोहन आगाशे, रमेश टिळेकर, स्वरूपा नारके, मोहन गोखले, सुरेश बसाळे, रमेश मेढेकर, नंदू पोळ, आनंद मोडक, उदय लागू, चंद्रकांत काळे, रवींद्र साठे, सुषमा जगताप, अशोक गायकवाड, श्रीकांत राजपाठक, भोंडे.. किती किती जणांची नावे लिहू? असा मस्त संच जमला. नानाच्या लग्नाचा रंगमंचावरचा सीन तर मला वाटतं तासाभरात आकारला. ब्राह्मणांच्या लग्नात कोणकोणते धार्मिक विधी असतात, याची माहिती जब्बारने लिहून आणायला सांगितली. चंदावरकरांनी लोकगीताच्या परंपरेतील मस्त चाल करून आणली होती. तालीम सुरू झाली आणि चंदावरकरांनी मला सांगितलं- 'तालासुरांचा फारसा विचार न करता तुझ्या पद्धतीने बिनधास्त म्हण. चुकलास तर रवी, चंदू, आनंद आणि आख्खा कोरस आहेच.'
मग काय हो?
मी- माझ्या नानाचं लगीन, माझ्या नानाचं लगीन..
सगळे- याच्या नानाचं लगीन, याच्या नानाचं लगीन..
'होऽऽ माझ्या नानाचं लगीन, माझ्या नानाचं लगीन' असं म्हणत मी नकळत जी गिरकी मारली, ती बघून जब्बारनं जी दाद दिली ती मी कधीही विसरू शकणार नाही. पुढे मी अनेक प्रयोग केले, पण 'हाऊसफुल्ल' प्रयोगातही ती तशी दाद मी नाही मिळवू शकलो. मी कुठेतरी कमी पडलो, हे नक्की!
'घाशीराम'ची संहिता मी वाचली त्यावेळी नाना फडणवीसांच्या आणि त्याकाळच्या पेशवाईच्या कारकीर्दीविषयी मीही अज्ञानी होतो. काही जुजबी गोष्टी माहीत होत्या. अधिक खोलात शिरून त्यांचा जरा बारकाईने अभ्यास करण्याचा मी प्रयत्न केला. लहानपणापासून मला वाचनाचे वेड. फर्गसन कॉलेजमधील ग्रंथपाल प्रभाकर साने आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध! त्यांच्या ओळखीने फर्गसन ग्रंथालयातील नाना फडणवीसांचे चरित्र (लेखक : वासुदेवशास्त्री खरे), 'घाशीराम कोतवाल' (लेखक : मोरोबा कान्होबा), नाना फडणवीसांचे आत्मचरित्र, 'पेशवाईतील शिक्षा', 'पेशवाईतील पत्रव्यवहार', बेळगावच्या रानडे नावाच्या लेखकाने नाना फडणवीस आणि पेशवाईसंबंधी लिहिलेले पुस्तक, नाटय़ाचार्य कृ. प्र. खाडिलकरांनी लिहिलेले 'सवाई माधवरावांचा मृत्यू'हे नाटक.. जे मिळेल ते साहित्य वाचून काढले. तेंडुलकरांनी नाटकात रंगविलेले 'गुलाबी' हे पात्रही एका जमाखर्चाच्या नोंदीत मिळाले. दिव्याच्या प्रसंगाचा तपशील 'पेशवाईतील शिक्षा' या पुस्तकात मिळाला. 'घाशीराम' आणि त्याचा मुलगा 'काशीराम' यांच्याविषयी वेगवेगळे संदर्भ मिळाले. ३१ ऑगस्ट १७९१ रोजी गुलटेकडी भागात घाशीरामला ब्राह्मणांनी दगडांनी ठेचून मारले, ही माहिती मिळाली. सवाई माधवराव, नाना फडणवीस, महादजी शिंदे (पाटीलबाबा) यांच्या राजकीय संबंधांविषयी माहिती मिळाली. माझी खात्री झाली की, नाटक लिहिण्यापूर्वी तेंडुलकरांनी या साऱ्या गोष्टींचा कसून अभ्यास केलेला आहे. नाटक कोणत्या पद्धतीने मांडायचे, याचा आराखडाही त्यांच्या डोक्यात पक्का आहे. सखारामबापू बोकील यांचा त्यांचे विरोधक 'वृद्ध कपित' असा उल्लेख करीत, हे वाचून 'माणूस काल, आज आणि उद्या सारखाच' याची खात्री पटली. 'घाशीराम कोतवाल'च्या निमित्ताने माझे बखरी, ताम्रपट, सनदा, पत्रव्यवहार यांचे नकळत बरेचसे वाचन झाले.
'घाशीराम'च्या यशाचे श्रेय कोणाला? यावर पुढे अनेक वर्षे उलटसुलट चर्चा झाल्या. याचे जब्बार पटेलांना श्रेय किती?, असा खवचट प्रश्नही अनेकांनी मला विचारला. आजवर मी त्याचे उत्तर दिले नाही, पण आज प्रथमच सांगतो- नाटक ही एक सामूहिक कलाकृती असते. लेखकापासून ते पडदा उघडणाऱ्या आणि पाडणाऱ्या प्रत्येकाचे त्यात योगदान असते. 'घाशीराम'च्या बाबतीत श्रेयाचा धनी कोण, हा प्रश्न निरर्थक आहे. पण निदान हे तरी मान्य कराल की नाही, की तेंडुलकरांनी लिहिलेल्या एका सूत्रधाराचे 'तीन' करणे, कलाकारांच्या गुणांप्रमाणे त्यांचा उपयोग करून घेणे आणि नाटकाचे 'तीन तेरा, नऊ अठरा' न वाजवता ४०-५० नवख्या कलाकारांना हाताशी घेऊन गोळीबंद प्रयोग सादर करणे, हे दिग्दर्शकामुळेच घडले ना! 'आम्हाला विषय वादग्रस्त वाटतो, पण तुमचा प्रयोग बघून आमचा विरोध बोथट होतो,' असं एकाच वेळी आक्रमक आणि हळुवार होऊन सांगणारे असंख्य प्रेक्षक भेटले. ह्यया तुमच्या तेंडुलकरांना नेमकं वाईटच कसं दिसतं? चांगलं दिसतच नाही का?ह्ण असे अनेकजण आजही विचारतात. 'सगळंच गुडी गुडी लिहिणारे तेंडुलकर नाहीत. माणसाच्या, समाजाच्या मनाचा ठाव घेणारे, त्यांच्या वर्तनाचा चढता-उतरता आलेख मांडणारे तेंडुलकरांसारखे लेखक थोडेच असतात,'असं माझं त्यावर उत्तर आहे- 'पचत असतील तर स्वीकारा; नसेल तर त्यांच्याकडे पाठ फिरवा.'
'घाशीराम'च्या तालमी सुरू असताना हळूहळू एक गोष्ट माझ्या ध्यानी येऊ लागली की, पी. डी. ए.मधील सीनिअर मंडळी फारशी तालमींकडे फिरकत नाहीत. भालबा केळकर आणि एक-दोघे दोन-तीन वेळा येऊन गेले, पण त्यांच्या वागण्या-बोलण्यात तटस्थपणा जाणवला. मी अगदीच नवखा; तरीही भीत भीत एके दिवशी सुरेश बसाळेला 'असं का रे?' असं विचारलं. त्यावर त्यानं दिलेलं उत्तर असं होतं- 'आमच्या संस्थेत ही पद्धत आहे. एकदा एखाद्याकडे काम सोपवलं की मधे त्यात कुणी लुडबूड करायची नाही. तू तुझं काम प्रामाणिकपणे करीत राहा.'
आज १४ डिसेंबर. रंगीत तालीम. केशवराव घुल्यांच्या साह्य़ाने पिंपरीच्या हिंदुस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्सच्या हॉलमध्ये ती ठरली. वेळ- रात्रीची. रंगभूषाकार निवृत्ती दळवी व प्रभाकर भावे चकोट केलेल्या ब्राह्मणांच्या रूपात आम्हाला सजवू लागले. कपाळी दुबोटी गंध, भुवईत शेंदराचा टिळा. पात्रे सजली. वाद्ये लागली. ध्वनी-प्रकाशयोजना झाली. रंगीत तालमीला स्वत: विजय तेंडुलकर आवर्जून उपस्थित होते. रंगीत तालीम छानच झाली. तालमीनंतर तेंडुलकरांनी काही कागद नाना फडणवीसांचे काम करणाऱ्या डॉ. मोहन आगाशे यांच्या हाती दिले.
दुसऱ्या दिवशीच्या तालमीत जब्बार रंगीत तालमीतल्या त्रुटी आमच्याकडून घोटून घोटून दुरूस्त करून घेत होता तसतसा माझा शिणवटा वाढत चालला. शेवटी तर मी बधिरच झालो. तालीम संपवून घरी आलो आणि तापाने फणफणलो. अंग जाम ठणकू लागलं. रात्रभर झोप नाही. सकाळी सकाळी माझी पत्नी संजीवनी हिनं अण्णा राजगुरूंना फोन केला, 'अहो, यांच्या अंगात बराच ताप आहे. पलीकडून उत्तर आलं-'रामला म्हणावं, शांत पडून राहा. सगळं ठीक होईल.' सकाळी १० वाजता डॉ. विद्याधर वाटवे घरी हजर! आल्या आल्या त्यानं कमरेखाली दोन इंजेक्शनं खुपसली. गोळ्या-औषधं दिली. सख्त विश्रांती घ्यायची आज्ञा केली आणि वर 'संध्याकाळी ७ वाजता भरतवर ये,' असं सांगून तो निघून गेला. 'काहीतरी खा आणि मगच गोळ्या घे,' असं त्यानं निक्षून सांगितलं.
संध्याकाळपर्यंत मी अर्धवट गुंगीत होतो. उठलो. दाढी-आंघोळ केली. देवाला हात जोडून विनवणी केली- 'आम्ही सर्वानी खूप मेहनत घेऊन हा खेळ उभा केला आहे. तो निर्विघ्नपणे होऊ दे.'
तिसरी घंटा घणघणली. प्रेक्षागृहातील दिवे विझले. रंगमंचाचा दर्शनी पडदा बाजूला झाला. धूसर प्रकाशात मागील काळ्या पडद्याच्या पाश्र्वभूमीवर एक चौकोनी कमान! त्यावर मधोमध श्रीगजाननाची मूर्ती. रंगमंचाच्या मध्यभागी एक निरांजनाचे तबक. त्याच्यामागे प्रेक्षकांना जमिनीवर मस्तक टेकवून अभिवादन करणारा कोणीएक तरुण कलाकार. मृदुंगावर दमदार थाप पडली. मृदुंगाच्या तालावर तो कोणीएक उभा राहिला. तबकातील फुले त्याने प्रेक्षकांच्या दिशेने उधळली. निरांजनाच्या ज्योती अधिकच उजळल्या. मृदुंगाच्या लयीवर तो तरुण नाचू लागला. आता त्याच्या नाचाचा वेग वाढला. नृत्य संपवून तो रंगपटात गेला. रंगमंचावर अस्पष्ट प्रकाश. आणि पुन्हा प्रेक्षागृहातील दिवे उजळले. प्रेक्षकांच्या मागील बाजूने आवाज घुमला- 'श्रीगणराय!' हा घोष वाढत गेला. करवतकाठी धोतर, बाराबंदी, गळ्यात करवतकाठी उपरणे, डोईवर पेशवाई पद्धतीचे चक्री पागोटे, कानात भिकबाळी, कपाळी दुबोटी गंध, भुवईत शेंदूर अशा वेशातील बारा-पंधरा ब्राह्मण 'श्रीगणराय'चा निनाद करीत प्रेक्षकांतून वाट काढीत रंगमंचावर अवतरले. त्यांनी रंगमंचावर रांग केली. हात जोडून पुतळ्यासारखे स्तब्ध उभे राहिले. पुन्हा मृदुंगावर दमदार थाप पडली. श्रीगजाननाचा मुखवटा धारण केलेला एक कलाकार रंगमंचावर आला आणि लयदार पावले टाकीत रंगमंचावर पदन्यास करू लागला. आता तो पाठीमागील नि:स्तब्ध असलेला ब्राह्मणांचा पडदा सजीव झाला. झुलू लागला. गाऊ लागला.
'श्रीगणराय नर्तन करी, आम्ही पुण्याचे बामण हरी।
बामण हरी नर्तन करी, श्रीगणराय फेर की धरी।।'
नमन संपले आणि ब्राह्मणांच्या पडद्यातील कलाकारांनी रंगमंचावर वेगवेगळ्या ठिकाणी वाद्यांच्या तालावर वेगवेगळे गट केले. वाद्यांचा वेग आणि आवाज टिपेला पोहोचला आणि सूत्रधाराने रंगमंचावर प्रवेश केला. 'हो! हो!! हो!!!' असा आवाज देऊन वाद्यांना थांबविण्याचा इशारा त्यानं केला आणि मागे स्तब्ध झालेल्या ब्राह्मणांची ओळख करून दिली.
'हे सर्व पुण्याचे ब्राह्मण!'
आता एक-एक गट आपली ओळख करून देऊ लागला. ह्यवेदान्तशास्त्री, ज्योतिषमरतड, आम्ही कुंभकोणम्, आम्ही बनारस..रंगमंचावर एक अद्भुत नाटय़ साकारत होतं. माझा ताप कुठल्या कु ठे पळून गेला होता. थकव्याचा पूर्णत: विसर पडला होता. पहिला अंक संपला नाना फडणवीसांच्या (मोहन आगाशे) स्वगत, पण जाहीर आदेशानं- 'घाश्या, अक्करमाश्या, केला केला तुला कोतवाल..'आणि सूत्रधाराने दवंडी घुमवली.. 'ऐका हो ऐका, आजपासून घाशीराम सावळदास यास पुण्याचा कोतवाल केला आहे होऽऽऽ' साध्या सुती धोतर-अंगरख्यातील घाशीराम धिमी पावले टाकीत रंगमंचाच्या मधोमध उभा राहिला. दोन ब्राह्मणांनी नम्रपणे त्याच्या अंगावर रेशमी अंगरखा चढवला. कंबरपट्टा बांधला. डोईवर सरदारी पगडी चढवली. तबकातील आसूड घाशीरामाच्या हाती दिला. घाशीरामाने रंगमंचावर विखुरलेल्या, नतमस्तक झालेल्या अवघ्या ब्राह्मणांवर करडी नजर फिरवली. त्याच्या हातातील आसूड कडाडला आणि त्याने विकट हास्य केले- हाऽऽ हाऽऽऽ हाऽऽऽ आणि पहिला अंक संपला. दुसऱ्या अंकाचा पडदा उघडला तोच मुळी अतिशय आक्रमक, अंगावर येणाऱ्या गीताच्या आणि पदन्यासाच्या तालावर. गीताचे शब्द तेच होते, पण त्यांचा आविष्कार अत्यंत वेगळा होता..
श्री गणराय नर्तन करी। आम्ही पुण्याचे बामण हरी।
बामण हरी नर्तन करी। श्रीगणराय फेर की धरी।।
ब्राह्मणांच्या पडद्याच्या मधोमध असलेला सूत्रधार पुढे आला आणि पुन्हा ह्यहोऽ होऽ होऽह्ण करीत पडद्याचा आवाज त्याने थांबवला आणि घोषणा केली-
'पुण्यनगरीत घाशीराम कोतवाल झाले.'
पडद्याचा कोरस घुमला- 'झाले!'
'त्याचा कारभार चाले हो, कारभार चाले।
गौरी बोले, नाना डोले, घाशीरामाचे फावले साचे।
गौरी नाचे, नाना नाचे, घाशीरामाचे फावले साचे।'
आणि पुढील कथानकात पुण्यावर कडक 'घाशीरामी' सुरू झाली. एके ठिकाणी घाशीराम फसला आणि अखेर शेवटी शेवट आला. एक हात जेरबंद करून घाशीरामाला ब्राह्मणांच्या पुढे सोडला.  संतप्त जमावाने त्याच्यावर दगडधोंडय़ांचा वर्षांव सुरू केला. जखमी, घायाळ, हिंस्र श्वापदासारखा रक्तबंबाळ घाशीराम गर्जना करतोच आहे- 'मी तुमच्या छाताडावर नाचलो. मारा, ठेचा मला.ह्ण मग एका भल्या धिप्पाड ब्राह्मणाने एक जड शिळा उचलली. आपल्या दोन्ही उंच हातांवर भक्कमपणे पेलली आणि जखमी घाशीरामाच्या मस्तकावर दाणकन् आदळली. घाशीराम गप्पगार झाला. आहे त्या स्थितीत जमाव गोठला आणि भग्न शिराच्या घाशीरामाचे मृत्युनृत्य सुरू झाले. ताशा कडाडला, टिपेला चढला आणि एका असहाय क्षणी तो धरणीवर कोसळला. कायमचा. जमावाने विजयी आरोळी ठोकली आणि धीरगंभीर पावले टाकीत नानांनी प्रवेश केला. सर्व जमावाने कमरेत वाकून त्यांना अभिवादन केले. नानांनी हातीच्या काठीने ढोसून घाशीराम नक्की मेला आहे, याची खात्री केली. त्यानंतर नाना रंगमंचाच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात आले. प्रकाशवलय फक्त त्यांच्यावर. मग नानांनी पुण्यनगरीला आवाहन केले- 'पुण्यपतनस्थ नागरिकहो! या नगरीवरील एक महान संकट सरले. एक रोग टळला. आपणा सर्वाना छळणाऱ्या नरकासुराचा- घाश्या कोतवालाचा वध झाला. श्रीच्या कृपेने सर्व यथायोग्य पार पडले. त्याची कृपा आपणा सर्वावर आहेच.. या शुभ घटेनेनिमित्त पुण्यामध्ये तीन दिवस उत्सव चालावा अशी आमची आज्ञा आहे.'
आरोळ्या ठोकीत पांगलेला ब्रह्मसमुदाय पुन्हा रांगेत उभा राहिला. पुन्हा दणक्यात-
'श्रीगणराय नर्तन करी। आम्ही पुण्याचे बामण हरी।।'चा द्रुतलयीत कोरस सुरू झाला. नानांनी गुलाबीला खुणेनं बोलावले. नानांच्या भोवती नाचून ती आत गेली. ब्राह्मणांचा पडदा घाशीरामाचे कलेवर ओलांडून पुढे आला. नानाही त्या बारा ब्राह्मणांच्या रांगेत सामील झाले आणि पुन्हा एकवार..
'श्रीगणराय नर्तन करी। आम्ही पुण्याचे बामण हरी।।
बामण हरी नर्तन करी। श्रीगणराय फेरच की धरी।।'चा गजर सुरू झाला. दर्शनी पडदा पडला. खेळ संपला.
१६ डिसेंबर १९७२! पुण्याच्या भरत नाटय़मंदिरात महाराष्ट्र राज्य नाटय़स्पर्धेत पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरीत प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन, पुणे या प्रायोगिक संस्थेने सादर केलेल्या 'घाशीराम कोतवाल' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग अशा रीतीने निर्विघ्नपणे पार पडला.. पुढील काळात अनेक विघ्ने निर्माण करण्यासाठी, अनेक वादळे उत्पन्न करण्यासाठी आणि झेलण्यासाठी, कलावंतांची कसोटी पाहण्यासाठी, त्यांच्या सत्त्वपरीक्षेसाठी, समाजमन ढवळून काढण्यासाठी आणि आधुनिक मराठी रंगभूमीवरील 'माइलस्टोन' ठरण्यासाठी! या सर्व ऐतिहासिक घटनांचा मी एक साक्षीदार. ह्यघाशीरामह्णमधील सूत्रधार! बाकी इतिहास पुढे केव्हातरी. तूर्त येथेच अर्धविराम घेतो-
'तुम्हा तो सुखकर हो शंकर..'    

Monday, 11 February 2013

दगडमातीतील मूर्तीसह शोधली मूर्ती कलाकारातील

 पीयूष नाशिककर । नाशिक
कधी इतरांचा चेहरा रंगवला, कधी स्वत:च मुखवटे लावून उभे राहिले.  लेखक, दिग्दर्शकही झाले. 45 वर्षे राज्य नाट्यस्पर्धा गाजवली. ते ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर.. नाशिककरांचे दादा. 85 व्या वर्षातही तरुणांना लाजवणारे त्यांचे काम. त्यांच्या कारकीर्दीवर हा ‘स्पॉटलाइट’.

अमृतधाम परिसरातील आपली मूर्तीशाळेत कामात दंग दादा.
०    दादा तुम्ही कलाक्षेत्राकडे कसे वळलात?
    - दगडी मूर्तीकाम करणे हीसुद्धा एक कलाच आहे. आमच्या घरातील बुजुर्ग मंडळी हेच काम करीत. पंचवटीच्या पाथरवट लेनमध्ये राहताना आठ महिने मजुरी करून पावसाळ्यात घरी परतणारी माणसे आसपास रहायची. त्या चार महिन्यांत करमणुकीचे साधन काय? मग गाणी लिहायची, नृत्य. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच काम करू लागलो.
०    तुम्ही तळागाळातील माणसांना नाटक शिकवले...
    - कलाकार कुठून हो आणणार? आहे त्या मजुरांनाच उभे करायचे. बरं.. सगळे आंगठे बहाद्दर. मग आपणच वाचून दाखवायचे. उपाशी रहायचो, पण नाटक कारायचो.
०    पूर्वी स्त्री पात्र मिळायचे नाही..
    - मुलींना पालक कामच करू द्यायचे नाहीत. आई-वडील नसलेली एक मुलगी तयार झाली. तालमीला उशीर व्हायचा. तिला सोडायला जावे लागायचे. ते ‘लाल कंदील’ नावाचे नाटक होते. त्या मुलीला पहिले पारितोषिकही मिळाले होते. काही वर्षांनी मग मी माझ्या नंदा रायते या मुलीलाच नाटकात उभे केले. आता बिटको कॉलेजला प्राध्यापिका आहे.
०    विजय नाट्य मंडळ कसे स्थापन झाले?
    - नरसिंह व्यायामशाळा हीच आमची संस्था. 15 आॅगस्ट 1948 रोजी विजय नाट्य मंडळाची स्थापना केली. गणेशोत्सवात ‘नावीन्य विजय मेळा’ या नावाने मेळ्यांतून सहभागी व्हायचो. तोपर्यंत स्वत: काही लिहीत नव्हतो. वाचनाच्या आवडीतून माझ्यातील लेखक जागा झाला.
०    तुम्ही स्पर्धेकडे कधी वळलात?
    - 1959 साली मी ‘मानाचा जरीपटका’ लिहिले. त्यावेळच्या नाशिकच्या नाट्यसंघात मोहनराव करंदीकर, आनंद सबनीस, तात्यासाहेब कार्यरत होते. एका नाटकासाठी मला नेपथ्य, संगीतासाठी बोलावले.  पुढे सबनीस म्हणाले की, तुम्हीही राज्य नाट्यस्पर्धेत भाग घ्या. अनेक जण म्हणे बाम्हनांचं काम दगड फोडणाºयांनी कशाला करायचं? वाईट वाटायचं. अनेक कलाकार नाटक सोडून जात. 1968 साली राज्य नाट्यस्पर्धेत पहिलं नाटक सादर केलं.
०    मग दादा बक्षिसांचं काय?
    - 1970 मध्ये ‘लाल कंदील’ नाटक केले. त्याला बक्षिसं मिळाली. त्यानंतर बक्षिसांची रांग सुरू झाली. त्यानंतर ‘कुशीत एका जन्म आपुला’ नाटक लिहिले.  लक्ष्मण पैठणकरांनी त्याचे खूप चांगले परीक्षण केले. पण त्यात त्यांनी आमच्या काही चुकाही छापल्या.
०    खर्चाचे कसे करायचे?
    - पहिल्या वर्षी नाटक करायला 900 रुपये लागले होते. तांबटांनी लाईटची मदत केली. चार आणे, दोन आणे गोळा केले. नाटकातील मंडळींनी  त्यावर्षी दिवाळी साजरी केली नाही. (डोळ्यात पाणी)
०    व्यावसायिक नाटकाकडे नाही वळलात?
    - काम करून, घर सांभाळून, स्पर्धा करत खरं तर नाही वळता आलं. पण त्याचं फारसं दु:खही नाही. ‘रंगदेवता उभी वादळी’ हे प्रायोगिक नाटक मात्र मी नक्कीच केलं. ‘खुनी’ नावाची एकांकिकाही केली.
०    निर्व्यसनींचे मंडळ अशी विजय नाट्य मंडळाची ख्याती आहे...
    - आमच्या घटनेतच तसे लिहिले आहे. एकदा मंडळाचा अध्यक्ष दारूच्या आहारी गेला. तो अध्यक्ष होता, पण नाटकाची सूत्रे माझ्याकडे होती. लिहिलेले मीच होते. त्याची मुख्य भूमिका असतानाही मी कापली आणि नाटक केले. निर्व्यसनामुळेच गेली 45 वर्षे श्रीराम विद्यालय आम्हाला तालमीसाठी जागा देते.

किस्से
 आचार्य अत्रेंचे ‘कवडी चुंबक’ नाटक बसविले होते. ते सेंट्रल जेलमध्ये करायचे होते. कोणीतरी म्हणाले की, लेखकाची परवानगी घेतली आहे का? त्याच वेळी जेलच्या आसपासच कुठेतरी त्यांचे भाषण होते. मग आम्ही जुने नाटक मेकअप करता करता म्हणालो. तेच सादर केले. त्यावेळी कवडी चुंबक केलेच नाही.

एकदा नांदूरला नाटक असताना ते लोक म्हणे, ‘शेतातच नाटक करा’. किमान एखादा उंच ओटा तरी हवा ना! मग ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर ‘सुभेदाराची सून’ हे नाटक सादर केले.


पत्नीची आठवण येते
    - माझ्या या कारकीर्दीत कुटुंबाची मोठी साथ मला मिळाली. नाटक करायचो तर 11 रुपये पूर्ण नाटकाला मानधन मिळायचे. त्यातच पत्नी फार आजारी पडली. तिला स्मृतिभ्रंश झाला. मुलं मात्र मोठ्या कष्टाने शिकली. आज पत्नी बरोबर नाही. तिची आठवण येणारच..

Friday, 8 February 2013

...यामुळेच घेतली निवृत्ती




'ना-ना तर-हेची नाटकं - भाग:३ (समाप्त )
४५ वर्षे सलग राज्य नाट्य सपर्धा केल्यानंतर नेताजी दादांनी घेतली निवृत्ती

गेल्या ४५ वर्षांपासून राज्य नात्य स्पर्धेत सातत्याने भाग घेणा-या नेताजी भोइर यांनी या स्पर्धेतून घेतलेली निवृत्ती वयपरत्वे असल्याची चर्चा नाट्य वर्तुळात असली तरी स्वत: दादांनी मात्र वर्षनुवर्षे निकालात होणा-या राजकारणामुळेच आपण निवृत्ती जाहीर करत असल्याचे स्पष्ट केले.

यंदा दादांनी स्वलिखित, दिग्दर्शित आणि अभिनित 'जाग व्हा र जाग व्हा ' या नाटकाच्या शीर्षकातूनच जणू एक संदेश दिला. त्यांच्या नाटकाला तिस-या क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले, अन दादांना रौप्यपदक; मात्र दादांनी 'आता या घाणेरड्या वातावरणात नकोच' अशा शब्दात नाराजी व्यक्त केली.

एकच नाटक, एकाच संस्था पुन्हा-पुन्हा सादर करते याला विरोध व्हायलाच हवा. यंदा नियम आला आहे की, जुनी नाटकेही चालतील. पण तो नियम सोयीस्करपणे वापरला जात आहे. त्यात असेही आहे कि, यापूर्वी ते नाटक सादर केलेल्या संस्थेला पुन्हा तेच नाटक सादर करता येणार नाही. आता काही तांत्रिक बदल करून ते नाटक सादर होत आणि परीक्षकही त्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे हे सगळच हास्यास्पद आणि चिंताजनक आहे. निकालातच राजकारण झाले तर हि मुल स्पर्धेत येतील का?  उलट तरुण रंगकर्मींना या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांनी मार्गदर्शन करायला हवे. गेल्या ४५ वर्षात एकदाही निष्पक्ष निकाल लागलेला नाही. यंदा तर माझे नाटक होण्यापूर्वी पाच दिवस आधीच माझ्या कानावर चर्चा आली होती की, निकाल आधीच लागलेला आहे. माझ्याच मंडळाची माणस म्हणतात, 'दादा, मग स्पर्धा कशाला करायची?' पण तात्यासाहेबंनी (कुसुमाग्रज ) मला सांगितले आहे की, नाटक प्रेक्षकांसाठी कर. मी तेच लक्षात ठेवले होते. पण, आता अश्या होते आहे. परीक्षक विकले जातात. अशा घटना तर किती घडल्या आहेत. अशी परखड मते दादांनी व्यक्त केली.

जुन्या अनुभवांचा दाखला

गेल्या वर्षीचा अनुभव
गेल्या वर्षी अल्फाबेटिकली माझे नाटक सादरीकरणासाठी पहिले होते. पण, माझ्या नाटकातील अभिनेत्रीला दुखापत झाली होती. त्यावेळी मी संयोजकांना विनंती केली कि, दोन दिवस माझे नाटक पुढे ढकला. पण मला तुम्ही नाटकच करू नका असे सांगण्यात आले.

निकाल लांबला दीड महिना
१९७६मध्येही असेच राजकारण झाले होते. त्यावेळी मी विरोध केल्याने माझे नाव 'काळ्या यादीत' टाकले होते; पण मी लढत राहिलो. त्यावेळी दीड महीन निकाल माझ्यामुळे लांबला होता. अधिकारी पदावर राजाराम हुमने होते. त्यांनी विनंती केली कि, दादा यापुढे असे होणार नाही. स्टे मागे घ्या, आणि मग त्या स्पर्धेचा निकाल लागला होता.

... तेव्हाच घेणार होतो राजा
१९९६मध्ये मी 'संगीत सागराच्या अंतरी' हे नाटक सदर केले होते. त्याचे लिखाण, दिगदर्शन, सादरीकरण याला पारितोषिक आणि दोन रोउप्यपद्केहि मिळाली होती. तरीही आमचे ते नाटक नंबरात नव्हते. खर तर मी त्याच वेळी राजा घेणार होतो.

न सुटणारा 'एका निकालाचा झांगडगुत्ता'


'ना-ना' त-हेचि नाटकं - भाग:२

समन्वयक, परीक्षकांनी केला गुंता सोडविण्याचा प्रयत्न
राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल आणि वाद हे समीकरण नवे नाही. मात्र हा वाद का, कोणामुळे आणि कशासाठी होतो याची चर्चा नेहमीच धुसर, अस्पष्टच होते, आणि हा झांगडगुत्ता वाढतच जातो. यंदाही परिस्थिती  तशीच आहे पण, या परिस्थितीला उत्तर देत समन्वयक आणि परीक्षकांनी गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.

हा गुंता सोडविताना समन्वयक राजेश जाधव म्हणाले की, 'गोदो'बद्दल फार कोणाचा रोष नाही. रोष आहे तो गाय्धानिंच्या 'रात्र काळी घागर काळी' या नाटक्बद्दल. हे नाटक वेगळ्या नावाने आधी दोन वेळा सादर झाले आहे. आता नियम ३ क़ असे सांगतो की, एकाच नाटक एकाच संस्थेला पुन्हा सदर करता येणार नाही. पण, या संस्थेने त्याचे ना बदलून वा त्यात अंतर्गत काही बदल केले असतील आणि त्यांना शासनाने प्रमाणपत्र दिले असेल तर आपण किंवा परीक्षक काय करणर? यासाठी सहभागी संस्थांनी स्पर्धेपूर्वीच पावलं उचलायला हवी. शहरात कोणती संस्था काय सदर करणर आहे, याची चर्चा होत असते. मग त्याच वेळी इतर संस्था आक्षेप का घेत नाहीत? समन्वयक हा संघ आणि शाषण यांच्यातील दुवा आहे. तो काय करणर?

तर याच गोंधळावर परीक्षक भाग्यश्री काळे यांनीही भाष्य करताना सांगितले की, हा निकाल अगदी चांगला लागला आहे. आता 'रात्र काळी घागर काळी'यावरून जो वाद होतो आहे, त्याला दोन बाजू आहेत या संघाने नियमाप्रमाणे पूर्तता केलेली आहे. त्याला शासन किंवा परीक्षक काही करू शकत नाही. नाटकही य्त्तम होते. तरीही मी स्वत: शासनाला विनंती करणार आहे की, सर्व परीक्षकांची बैठक घेऊन या जुन्या आणि नवीन नाटकांबद्दल काही तरी तोडगा काढावा. खरतर नवीन संहिता यायलाच हव्यात. नेताजी भोइरन्सर्खे ज्येष्ठ कलावंत दरवर्षी नवीन नाटक लिहून सादर करतात. तर मग इतरांनी का करू नये? उलट यंदा शासनाने समन्वयक नेमल्याने स्पर्धा उत्तम झाली. सांस्कृतिक खात्याच्या संचालकांना येथे येउन त्याची दाखल घ्यावी लागली. हे कमी आहे का?

Thursday, 7 February 2013

'स्पर्धा काळी, निकाल काळा'



'ना-ना' त-हेची नाटकं - भाग:१

 राज्य नाट्य स्पर्धेच्या निकालाबद्दल उभयपक्षी मतप्रदर्शन 

राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या 'रिझल्ट मान्य नाही...' असाच सूर अनेक नाटकवाल्यांनी व्यक्त केला. रिझल्टमध्ये प्रवासात खाडाखोड झाल्याची माहिती काही जणांना त्यांच्या सूत्रांनी दिल्याने आता नाशिकमध्ये नाटक करावं की नाही इथपर्यंत शंका घेण्यात येत आहे, तर परीक्षक, समन्वयक यांच्या  म्हणण्यानुसार शासनाच्या, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण महामंडळाच्या नियमांचा हा फटका आहे. काही संस्थांनी 'स्पर्धा काळी, निकाल काळा' अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 या विषयी 'अश्वमेध'च्या कलाकारांनी  अन्याय  होत असल्याचे व्यक्त केले. मागील वर्षी संपूर्ण राज्यात प्रथम आलो होतो यंदाही आमचे 'फिल्मसिटी' 'आणि 'गोदो वन्स अगेन'मध्येच स्पर्धा होती. आम्ही अर्ज करायला गेलो तेव्हाच नाशिकच्या समन्वयकाने 'तुम्ह्च्या विरोधात वातावरण आहे, अर्ज कशाला करता' असे वक्तव्य केल्याने धक्का बसला होता आता चुका जाणून घेण्यासाठी संबंधिताना फोन करतोय; पण कोणीच बोलायाल तयार नाही. काहीतरी 'फिक्सिंग' झाले आहे. स्मित तळवलकर, विनय आपटेही आमची नाटक उचलून धरतात. मग  आमच्यावर असा अन्याय का? अशी प्रतिक्रिया प्राजक्त, प्रणव, श्रीपाद यांनी व्यक्त केली.

 अग्नेय  क्रिएशनच्या कलाकारांनीही अगदीच निकाल योग्य आहे हे म्हणणे चूक आहे. 'गोदो' एक नंबरला ठीक आहे. पण इतर  काय ? वैयक्तिक पारितोषिकही असेच. परीक्षकांनी कदाचित भूमेकेची लेन्ग्थ  बघून बक्षिसे दिली. त्यामुळे अनेकांना पात्रता नसताना बक्षिसे मिळाली. लोहीतावादी  सुधीर कुलकर्णी यांनीही 'गोदो'बद्दल काही म्हणन नाही. पण, इतर दोन नाटकांचे काय? नेताजी भोइर यांचा सन्मान व्हायलाच हवा. पण, इतरांवर अन्याय करून? आणि रात्र काळी घागर कलीच काय? राज्य नाट्य स्पर्धेतच सदर झालेल्या 'राजा वाक्रपात' या नाटकाच नाव बदलून त्याच स्पर्धेत नाटक सदर करण लाजीरवाण असल्याचे व्यक्त केले.   

 तर ज्या 'रात्र काळी घर काळी' या नाटकाविषयी हा वाद निर्माण झाला त्या नाटकाचे दीपक मंडळाचे सुरेश गायधनी यांनी, मलाही हा निकाल अनपेक्षित असल्याचे सांगितले. हे कलाकारांच्या कष्टाचे फळ आहे. पाच प्रयोग करायचे होते म्हणून मी ते राज्य नाट्य स्पर्धेत घेतले. 'फिल्मसिटी', 'एका रात्रीचा झांगडगुत्ता' यांचाही विचार व्यायला हवा होता. नेताजी भोइर दरवर्षी परीक्षक सांगतील ती निकाल अखेरचा मानतात तोच आदर्श सर्वांनी ठेवावा अशी प्रतिक्रिया दिली.