Thursday, 7 February 2013

'स्पर्धा काळी, निकाल काळा'



'ना-ना' त-हेची नाटकं - भाग:१

 राज्य नाट्य स्पर्धेच्या निकालाबद्दल उभयपक्षी मतप्रदर्शन 

राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या 'रिझल्ट मान्य नाही...' असाच सूर अनेक नाटकवाल्यांनी व्यक्त केला. रिझल्टमध्ये प्रवासात खाडाखोड झाल्याची माहिती काही जणांना त्यांच्या सूत्रांनी दिल्याने आता नाशिकमध्ये नाटक करावं की नाही इथपर्यंत शंका घेण्यात येत आहे, तर परीक्षक, समन्वयक यांच्या  म्हणण्यानुसार शासनाच्या, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण महामंडळाच्या नियमांचा हा फटका आहे. काही संस्थांनी 'स्पर्धा काळी, निकाल काळा' अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 या विषयी 'अश्वमेध'च्या कलाकारांनी  अन्याय  होत असल्याचे व्यक्त केले. मागील वर्षी संपूर्ण राज्यात प्रथम आलो होतो यंदाही आमचे 'फिल्मसिटी' 'आणि 'गोदो वन्स अगेन'मध्येच स्पर्धा होती. आम्ही अर्ज करायला गेलो तेव्हाच नाशिकच्या समन्वयकाने 'तुम्ह्च्या विरोधात वातावरण आहे, अर्ज कशाला करता' असे वक्तव्य केल्याने धक्का बसला होता आता चुका जाणून घेण्यासाठी संबंधिताना फोन करतोय; पण कोणीच बोलायाल तयार नाही. काहीतरी 'फिक्सिंग' झाले आहे. स्मित तळवलकर, विनय आपटेही आमची नाटक उचलून धरतात. मग  आमच्यावर असा अन्याय का? अशी प्रतिक्रिया प्राजक्त, प्रणव, श्रीपाद यांनी व्यक्त केली.

 अग्नेय  क्रिएशनच्या कलाकारांनीही अगदीच निकाल योग्य आहे हे म्हणणे चूक आहे. 'गोदो' एक नंबरला ठीक आहे. पण इतर  काय ? वैयक्तिक पारितोषिकही असेच. परीक्षकांनी कदाचित भूमेकेची लेन्ग्थ  बघून बक्षिसे दिली. त्यामुळे अनेकांना पात्रता नसताना बक्षिसे मिळाली. लोहीतावादी  सुधीर कुलकर्णी यांनीही 'गोदो'बद्दल काही म्हणन नाही. पण, इतर दोन नाटकांचे काय? नेताजी भोइर यांचा सन्मान व्हायलाच हवा. पण, इतरांवर अन्याय करून? आणि रात्र काळी घागर कलीच काय? राज्य नाट्य स्पर्धेतच सदर झालेल्या 'राजा वाक्रपात' या नाटकाच नाव बदलून त्याच स्पर्धेत नाटक सदर करण लाजीरवाण असल्याचे व्यक्त केले.   

 तर ज्या 'रात्र काळी घर काळी' या नाटकाविषयी हा वाद निर्माण झाला त्या नाटकाचे दीपक मंडळाचे सुरेश गायधनी यांनी, मलाही हा निकाल अनपेक्षित असल्याचे सांगितले. हे कलाकारांच्या कष्टाचे फळ आहे. पाच प्रयोग करायचे होते म्हणून मी ते राज्य नाट्य स्पर्धेत घेतले. 'फिल्मसिटी', 'एका रात्रीचा झांगडगुत्ता' यांचाही विचार व्यायला हवा होता. नेताजी भोइर दरवर्षी परीक्षक सांगतील ती निकाल अखेरचा मानतात तोच आदर्श सर्वांनी ठेवावा अशी प्रतिक्रिया दिली.

No comments:

Post a Comment