'ना-ना तर-हेची नाटकं - भाग:३ (समाप्त )
गेल्या ४५ वर्षांपासून राज्य नात्य स्पर्धेत सातत्याने भाग घेणा-या नेताजी
भोइर यांनी या स्पर्धेतून घेतलेली निवृत्ती वयपरत्वे असल्याची चर्चा नाट्य वर्तुळात असली तरी स्वत: दादांनी मात्र वर्षनुवर्षे निकालात होणा-या राजकारणामुळेच आपण निवृत्ती जाहीर करत असल्याचे स्पष्ट केले.
यंदा दादांनी स्वलिखित, दिग्दर्शित आणि अभिनित 'जाग व्हा र जाग व्हा ' या नाटकाच्या शीर्षकातूनच जणू एक संदेश दिला. त्यांच्या नाटकाला तिस-या क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले, अन दादांना रौप्यपदक; मात्र दादांनी 'आता या घाणेरड्या वातावरणात नकोच' अशा शब्दात नाराजी व्यक्त केली.
एकच नाटक, एकाच संस्था पुन्हा-पुन्हा सादर करते याला विरोध व्हायलाच हवा. यंदा नियम आला आहे की, जुनी नाटकेही चालतील. पण तो नियम सोयीस्करपणे वापरला जात आहे. त्यात असेही आहे कि, यापूर्वी ते नाटक सादर केलेल्या संस्थेला पुन्हा तेच नाटक सादर करता येणार नाही. आता काही तांत्रिक बदल करून ते नाटक सादर होत आणि परीक्षकही त्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे हे सगळच हास्यास्पद आणि चिंताजनक आहे. निकालातच राजकारण झाले तर हि मुल स्पर्धेत येतील का? उलट तरुण रंगकर्मींना या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांनी मार्गदर्शन करायला हवे. गेल्या ४५ वर्षात एकदाही निष्पक्ष निकाल लागलेला नाही. यंदा तर माझे नाटक होण्यापूर्वी पाच दिवस आधीच माझ्या कानावर चर्चा आली होती की, निकाल आधीच लागलेला आहे. माझ्याच मंडळाची माणस म्हणतात, 'दादा, मग स्पर्धा कशाला करायची?' पण तात्यासाहेबंनी (कुसुमाग्रज ) मला सांगितले आहे की, नाटक प्रेक्षकांसाठी कर. मी तेच लक्षात ठेवले होते. पण, आता अश्या होते आहे. परीक्षक विकले जातात. अशा घटना तर किती घडल्या आहेत. अशी परखड मते दादांनी व्यक्त केली.
गेल्या वर्षीचा अनुभव
गेल्या वर्षी अल्फाबेटिकली माझे नाटक सादरीकरणासाठी पहिले होते. पण, माझ्या नाटकातील अभिनेत्रीला दुखापत झाली होती. त्यावेळी मी संयोजकांना विनंती केली कि, दोन दिवस माझे नाटक पुढे ढकला. पण मला तुम्ही नाटकच करू नका असे सांगण्यात आले.
निकाल लांबला दीड महिना
१९७६मध्येही असेच राजकारण झाले होते. त्यावेळी मी विरोध केल्याने माझे नाव 'काळ्या यादीत' टाकले होते; पण मी लढत राहिलो. त्यावेळी दीड महीन निकाल माझ्यामुळे लांबला होता. अधिकारी पदावर राजाराम हुमने होते. त्यांनी विनंती केली कि, दादा यापुढे असे होणार नाही. स्टे मागे घ्या, आणि मग त्या स्पर्धेचा निकाल लागला होता.
... तेव्हाच घेणार होतो राजा
१९९६मध्ये मी 'संगीत सागराच्या अंतरी' हे नाटक सदर केले होते. त्याचे लिखाण, दिगदर्शन, सादरीकरण याला पारितोषिक आणि दोन रोउप्यपद्केहि मिळाली होती. तरीही आमचे ते नाटक नंबरात नव्हते. खर तर मी त्याच वेळी राजा घेणार होतो.
४५ वर्षे सलग राज्य नाट्य सपर्धा केल्यानंतर नेताजी दादांनी घेतली निवृत्ती

जुन्या अनुभवांचा दाखला
गेल्या वर्षीचा अनुभव
गेल्या वर्षी अल्फाबेटिकली माझे नाटक सादरीकरणासाठी पहिले होते. पण, माझ्या नाटकातील अभिनेत्रीला दुखापत झाली होती. त्यावेळी मी संयोजकांना विनंती केली कि, दोन दिवस माझे नाटक पुढे ढकला. पण मला तुम्ही नाटकच करू नका असे सांगण्यात आले.
निकाल लांबला दीड महिना
१९७६मध्येही असेच राजकारण झाले होते. त्यावेळी मी विरोध केल्याने माझे नाव 'काळ्या यादीत' टाकले होते; पण मी लढत राहिलो. त्यावेळी दीड महीन निकाल माझ्यामुळे लांबला होता. अधिकारी पदावर राजाराम हुमने होते. त्यांनी विनंती केली कि, दादा यापुढे असे होणार नाही. स्टे मागे घ्या, आणि मग त्या स्पर्धेचा निकाल लागला होता.
... तेव्हाच घेणार होतो राजा
१९९६मध्ये मी 'संगीत सागराच्या अंतरी' हे नाटक सदर केले होते. त्याचे लिखाण, दिगदर्शन, सादरीकरण याला पारितोषिक आणि दोन रोउप्यपद्केहि मिळाली होती. तरीही आमचे ते नाटक नंबरात नव्हते. खर तर मी त्याच वेळी राजा घेणार होतो.
No comments:
Post a Comment